Homeआरोग्यविज गेली ,जनरेटर बंद, शिशु धोक्यात, रुग्ण रेफर, शौचालय कोरडं... आणि आमदारांचे...

विज गेली ,जनरेटर बंद, शिशु धोक्यात, रुग्ण रेफर, शौचालय कोरडं… आणि आमदारांचे बॅनर हवेत लाटत आहेत.

वणा दर्शन  वृत्त : ✍️प्रज्योत लिहितकर (मुख्य संपादक) Mo 9623471880
हे काय चित्र आहे? जेथे नवजात शिशु अंधाराच्या सावलीत श्वास घेण्यासाठी धडपडत आहेत, तेथे वीज नाही, ऑक्सिजन नाही, पाणी नाही! हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय – जे कथित ‘उपजिल्हा’ आहे, पण वास्तवात मृत्यूचा कारखाना झालंय! दुपार चार वाजल्यापासून संध्याकाळी दहा वाजेपर्यंत अंधार मांडला गेलाय, जनरेटरमध्ये डिझेल नाही, बाकीचे जनरेटर बंद पडलेत. आणि या भयावह परिस्थितीत नवजात शिशुंच्या डोळ्यांत अंधार उमटला आहे! ऑक्सिजनची व्यवस्था? हा तर प्रश्नच नाही – अभाव आहे, पूर्ण अभाव! हे शिशु जगात येताच मृत्यूच्या दातांमध्ये सापडले आहेत, आणि याला जबाबदार कोण? हे रुग्णालयाचे अधीक्षक, जे बेजबाबदारपणे झोपेच्या पायरीत गुंग आहेत!

स्थानिक आमदारांच्या डोळ्यांपुढे घडत असूनही, त्यांचं लक्ष फक्त बॅनरवर! ४०० बेडचे नवीन जिल्हा रुग्णालय मंजूर केलं, मॉड्युलर आयसीयू आणि ट्रॉमा केअरचं मोठ्या गाजावाजा उद्घाटन केलं – शहरभर बॅनर लावले, होल्डिंग्स लावले! पण आज त्या ‘उद्घाटनाच्या’ फळांचा अभाव दिसतोय. आमदार साहेब, हे ‘कार्यसम्राट’ कसे? त्यांच्या गावातील रुग्णालय अशी बिकट स्थितीत पोहोचलंय, आणि ते कुठे? रुग्णालय समितीचे सदस्य झोप काढत आहेत का? की फक्त निवडणुकीच्या वेळी जागृत होतात?
आणि ही केवळ आजची गोष्ट नाही. २२ जुलै रोजी इथे एका रुग्णाची शस्त्रक्रिया झाली, आणि शस्त्रक्रियेनंतर त्याच्या अंगावर मुंग्या आढळल्या! मुंग्या! रुग्णाच्या जखमांवर मुंग्या चावत होत्या, आणि डॉक्टर? ते कुठे? हे रुग्णालय आहे की कीटकालय? अशीच दुर्दैवाची साखळी चालू आहे – वीज गेली, जनरेटर बंद, शिशु धोक्यात, रुग्ण रेफर, शौचालय कोरडं… आणि आमदारांचे बॅनर हवेत लाटत आहेत!या भोंगळ कारभाराची किंमत कोण चुकवणार? रुग्णालयातील शौचालयांमध्ये पाण्याचा थेंबही नाही – रुग्णांसारखे तेही तहानलेले! आणि रुग्ण? त्यांना भरती करणं म्हणजे दूरची गोष्ट, डायरेक्ट वर्धा सेवाग्राम किंवा सावंगीला रेफर करा, असा आदेश! हे रुग्णालय आहे की रेफरिंग एजंट? रुग्णांच्या प्रकृतीत काही बिघडलं, तर दोष कोणाचा? या बेजबाबदार प्रशासनाचा, की आमदारांच्या खोट्या आश्वासनांचा?
आज या सर्व भोंगळ कारभाराच्या विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे ठिय्या मांडून राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतःकडून जनरेटर उपलब्ध करून दिलेया जनरेटरमुळे रुग्णालयात प्रकाश पसरला, पण खरा प्रकाश येणार आहे – जबाबदारीचा! आमदार साहेब, समिती सदस्य – जागा की नाही? अन्यथा, हा ठिय्या हिंगणघाटभर पसरेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वात ट्रॅक्टर रॅली; वर्धा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा

0
 वर्धा जिल्हा विशेष ; सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व नेते मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात 'महाएल्गार' आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या...

सोयाबीनची ना पिकी झाल्या असल्याकारणाने शेतकऱ्याने केली आत्महत्या

0
वृत्त : तुषार  हिंगणेकर ( सिंधी रेल्वे मुख्य प्रतिनिधी)  श्री ज्ञानेश्वर वामन वाघमारे (राहणार सिंधी रेल्वे,, नदीपलीकडे) सोयाबीनची ना पिकी झाल्या असल्याकारणाने 14 एकरात एक पोते...

हिंगणघाट हादरलं! सहकार क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या ‘नटवरलाल’ जोडीचा 92 कोटींचा महाघोटाळा; शासकीय यंत्रणांचा मौनव्रत...

0
हिंगणघाटचा 'नटवरलाल' घोटाळा: आशिष राठी-अजय मल यांचा कोट्यवधींचा लूटमार खेळ वर्धा जिल्हा विशेष : सहकार क्षेत्रातील नैतिकतेला पायदळी तुडवत, हिंगणघाटातील स्व. बापूरावजी देशमुख सहकारी साखर...

सावली ( वाघ ) सर्कल येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न

0
हिंगणघाट विशेष : १२ऑक्टोबर २०२५ रोज रविवारला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाची मा.माजी उद्योग राज्यमंत्री तथा माजी आमदार श्री. अशोक भाऊ शिंदे...

भारत मुक्ती मोर्चा अंतर्गत जन आक्रोश रॅलीचे आयोजन

0
 हिंगणघाट विशेष : दिनांक 15 ऑक्टोबर 2025 ला भारत मुक्ती मोर्चा अंतर्गत, देशातील 32 राज्यात आणि 625 जिल्ह्यामध्ये एकाच वेळी चौथ्या आणि अंतिम चरणातील...

error: Content is protected !!