वार्ताहर ; मा. श्री. हरीश ढगे
हिंगणघाट शहरातील नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात भाजपने नगराध्यक्ष व युतीतील 30 नगरसेवक निवडून आणत दणदणीत विजय प्राप्त केला.सदर निवडणुकीत भाजपच्या उमेदवार नैना तुळसकर यांनी 59097 मतातील 51.90 टक्के म्हणजे 30674 मते घेत विजय पटकावला विशेष म्हणजे शहरातील विसही प्रभागांमध्ये प्रभाग क्रमांक 14 येथे भाजपाच्या नगराध्यक्ष नैना तुळसकर यांना सर्वाधिक 64.79 टक्के मते मिळाली. हिंगणघाट शहरातील कमळाला मिळालेली सर्वात जास्त टक्केवारी आहे. लोकसभेच्या निवडणुकीत माजी खासदार रामदास तडस यांना हिंगणघाट शहरात मिळालेल्या 3250 मतांच्या आघाडीत शहरातील सर्वात जास्त 850 मतांची आघाडी याच प्रभागातून मिळाली. नंतर झालेल्या विधासभेच्या निवडणूकीत आमदार समीर कुणावार यांना 1496 मतांची आघाडी दिली. तर आता नगराध्यक्ष निवडणुकीवेळी 2781 पैकी 1802 मते देत शहरातील सर्वाधिक 64.79% मतांची टक्केवारी देत प्रभाग 14 ने आपला टक्केवारीचा आपला चढता क्रम कायम ठेवला.

या प्रभागातून नगरसेवक पदाकरीता 2792 मतांपैकी 1930 मते 69.12% मते घेत शहरात द्वितीय क्रमांकाची टक्केवारी संजय माडे यांनी घेतली आपल्या कामांचा झंझावात व सदैव जनसंपर्क असणारे संजय माडे यांनी तत्कालीन भाजपा प्रदेशाध्यक्ष व अताचे कॅबिनेट मंत्री मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला होता तेव्हा पासून प्रभाग 14ला भाजपाच्या मतांचा चढता क्रम सुरू आहे.सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपली ओळख निर्माण करणारे संजय माडे यांनी आमदार समीर कुणावार यांचे मार्गदर्शनात भाजपचे शहर कार्याध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केलेले आहे.

माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी निकटवर्तीय व विश्वासू असलेले संजय माडे हे हिंगणघाट नगर परिषद उपाध्यक्ष पदाचा दावा करू शकतात. या स्पर्धेत सोनु उर्फ सुदर्शन गवळी, निलेश ठोंबरे, धनंजय बकाने, दिनेश वर्मा, यांची देखील नावे चर्चेत आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत नाटकीय घटनाक्रमा नंतर भाजपचे आंतरिक विविध गट उपाध्यक्ष पदाकरीता आपल्या व्यूह रचना तयार करत आहे. परंतु हे पद भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमार्फत बसंतानी गटाला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.





















