हिंगणघाट (वर्धा जिल्हा,) येथे भगवा धारी क्रीडा परिवारच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर वार्डमध्ये तीन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 52 किलो वजन गटातील खेळाडूंसाठी आहे.उद्घाटन सोहळा: दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी हिंगणघाटच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. नयनाताई उमेश तुळसकर यांच्या हस्ते पार पडला.

दिनांक 24 जानेवारी 2026: प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते:मा.
श्री. भास्करजी शेंडे (सामाजिक कार्यकर्ते, हिंगणघाट)
श्री. भैय्याजी निखाडे ( उपाध्यक्ष महाराष्ट्र योग शिक्षक संघ तथा भाजपा ओबीसी सेल)
श्री. अनिल गहेरवार ( भाजप शहर उपाध्यक्ष)
श्री .प्रज्योत लिहितकर ( मुख्य संपादक वणा दर्शन)
श्री. देवा भाऊ वाघमारे ( मंत्री विश्व हिंदू परिषद)
श्री. राकेशजी शर्मा (स्टार प्रचारक, भाजपा)
श्री. नारायणराव अवचट
श्री. ज्ञानेश्वरराव भागवते (भाजपा महामंत्री)
ही स्पर्धा स्थानिक युवकांना खेळाच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्यासाठी आणि खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धा श्री संत ज्ञानेश्वर वार्ड येथे सुरू असून, तीन दिवस चालणार आहे (23 ते 25 जानेवारी 2026).

अशा स्थानिक स्तरावरील क्रीडा कार्यक्रम स्थानिक समुदायाला एकत्र आणतात आणि युवा पिढीला अनुशासन, साहस व टीमवर्क शिकवतात. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल भगवा धारी क्रीडा परिवाराचे अभिनंदन!






















