
वर्धा जिल्हा विशेष ; सरसकट कर्जमाफीच्या मुद्द्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व नेते मा. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वात ‘महाएल्गार’ आंदोलनाला सुरुवात झाली आहे. या आंदोलनाची सुरुवात ट्रॅक्टर रॅलीने करण्यात आली

असून, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.या रॅलीत शेकडो शेतकरी, ट्रॅक्टर चालक आणि कार्यकर्ते सहभागी झाले .

या आंदोलनात वर्धा जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी सक्रिय सहभाग घेतला. वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसह रॅलीत सहभागी होताना वांदिले यांनी पक्षाच्या वतीने पूर्ण पाठिंबा जाहीर केला. “राष्ट्रवादी काँग्रेस नेहमीच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढत आली आहे. महायुती सरकारच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांची ‘काळी दिवाळी’ साजरी होतेय. कर्जमाफी ही शेतकऱ्यांची नैसर्गिक हक्क आहे आणि त्यासाठी आम्ही बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत,” असे वांदिले यांनी सांगितले. वर्धा जिल्ह्यातील सहकार्यामुळे हे आंदोलन अधिक व्यापक होण्याची शक्यता आहे.























