तुषार हिंगणेकर ( सिंधी रेल्वे प्रतिनिधी)
सिंदी (रेल्वे) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा द्यावा, या जिव्हाळ्याच्या मागणीसाठी सिंदी (रेल्वे) शहर व परिसरातील नागरिक रस्त्यावर उतरले. वस स्टँड चौकातील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर भजन आंदोलनाच्या माध्यमातून संतप्त जनतेने शांत पण ठाम लढा उभारला.
परिसरातील हजारो नागरिकांसाठी हे एकमेव आरोग्य केंद्र असतानाही आजही ते प्राथमिक स्वरूपातच उपचार होत असल्याने गंभीर रुग्णांना वर्धा, नागपूरकडे हलवण्याची वेळ येते, ही मोठी शोकांतिका असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शासन विकासाच्या गप्पा मारते; मात्र सिंदीच्या आरोग्य सुविधांकडे डोळेझाक केली जात असल्याचा संताप आंदोलनातून व्यक्त करण्यात येत आहे
टाळ-मृदंगाच्या गजरात,“रुग्णालय हा आमचा हक्क आहे — भीक नाही!”
कोट्यवधींचा निधी इतरत्र खर्च होतो, पण सिंदीच्या रुग्णालयासाठी नाही का? असा थेट सवाल प्रशासनाला विचारण्यात आला आज भजन आंदोलन असले तरी, उद्या मोठे जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.

आंदोलन शांततेत पार पडेल ; मात्र जनतेच्या संयमाची परीक्षा घेऊ नये, असा सूर सर्वत्र होता. विविध सामाजिक संघटना, युवक, महिला व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची विनंती करण्यात आली असूनसिंदी (रेल्वे)ला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.





















