वृत्त : प्रवीण कडू, हिंगणघाट
हिंगणघाट न.पा.ची निवडणूक पार पडली नविन नगरसेवक निवडून आले, निवडून आलेल्या लोकांना पर्यावरणाची किती समज आहे हे सध्या सांगता येणार नाही परंतु शहराचे पर्यावरण उत्तम राखणे हेच नगर परिषदेचे प्रथम कर्तव्य आहे त्यासाठीच न.पा.निवडणूक घेतल्या जाते परंतु निवडून आलेल्या नगरसेवकांना त्यांचा जवाबदाऱ्या आणि कर्तव्यचा विसर पडला असे चित्र काल पाहायला मिळाले विजयाचा उन्माद इतका जास्त होता त्यात ढोल- ताशे, बँड , D J चे कानफाडणारे मोठे आवाज, फटाक्यांची आतीषबाजी गुलालाची अतिउधळण रस्त्यावर लागलेले
सर्वत्र कचऱ्याचे ढिग इतका विजयाचा उन्माद कशासाठी जे पराभूत झाले तेही तुमचा गावचे तुमचेच मित्र ते काही परक्या शत्रू राष्ट्राचे नव्हते.
मला आठवते पूर्वी निवडून आलेले नगरसेवक आपल्या वार्डात घरोघरी फिरून मोठयाचा आशीर्वाद घेत असे नगरसेवक म्हणून जवाबदारी दिल्याबद्दल धन्यवाद देत असे पण असे मिरवणूका काढत नसे.
आज जे निवडून आले त्यांनी निवडून येण्या करीता काय काय केलं असेल त्याबद्दल मला बोलायचे नाही पण एक सामान्य नागरिक म्हणून निवडून येणाऱ्या लोकांना मि त्यांच्या जवाबदाऱ्या सांगू इच्छितो.
नगरसेवक (Municipal Councillor) यांची पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत महत्त्वाची जबाबदारी असते. स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शहरातील पर्यावरणाचा दर्जा राखणे हे त्यांचे कर्तव्य आहे.

मुख्य जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे
घनकचरा व्यवस्थापन,कचऱ्याची योग्य विल्हेवाट, कंपोस्टिंग व रिसायकलिंगला प्रोत्साहन,प्लास्टिक कचरा कमी करण्यासाठी जनजागृती
पाणी संवर्धन व स्वच्छता
पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवणे
सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प कार्यक्षम ठेवण्यावर लक्ष
जलसंधारण, रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी योजना राबवणे
हरित क्षेत्र व वृक्षसंवर्धन
वृक्षलागवड व वृक्षसंरक्षण मोहिमा,
बेकायदेशीर वृक्षतोड थांबवणे,
उद्याने, खुली मैदाने जतन करणे.
_ हवेचे व आवाजाचे प्रदूषण नियंत्रण
वाहतूक, बांधकाम, औद्योगिक प्रदूषणावर नियंत्रण
DJ, फटाके, लाउडस्पीकर याबाबत नियमांची अंमलबजावणी,
नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कारवाई.
_ जैवविविधता व प्राणी संरक्षण
तलाव, नद्या, टेकड्या, जंगलसदृश भागाचे जतन,
पक्षी व प्राण्यांचे अधिवास नष्ट होणार नाही याची काळजी,
पर्यावरण संवेदनशील भागात विकासकामांवर नियंत्रण,
_ कायदे व धोरणांची अंमलबजावणी
पर्यावरण संरक्षण कायदे, घनकचरा नियम, प्लास्टिक बंदी इ. लागू करणे
नगरपालिकेच्या पर्यावरणविषयक ठरावांना पाठिंबा देणे
_ जनजागृती व नागरिक सहभाग
स्वच्छता मोहिमा, पर्यावरण दिन, वृक्षारोपण कार्यक्रम
शाळा, संस्था, स्वयंसेवी संघटनांशी समन्वय.
_ शाश्वत विकासाला प्रोत्साहन
पर्यावरणपूरक विकास आराखडे,
सायकल ट्रॅक, पादचारी मार्ग, सार्वजनिक वाहतूक यांना प्रोत्साहन
थोडक्यात सांगायचे तर:
नगरसेवक हा आपल्या प्रभागातील पर्यावरणाचा रक्षक असतो. विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे ही त्यांची नैतिक व कायदेशीर जबाबदारी आहे.
एक जाहिरात होती त्यात कुणीतरी म्हणतो “अरे कचरे वाले तो हम है ये तो कचरा उठाके स्वच्छता करणे वाले है ”
निवडून आलेल्या सर्व नगरसेवक, नगराध्यक्षा यांना शुभेच्छा





















